कर्नाटकची जातनिहाय गणनेची आकडेवारी नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार

बंगळुरू – बिहारपाठोपाठ आता कर्नाटकमध्ये जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.या राज्यातील जातनिहाय जनगणना अहवाल हा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष के.जयप्रकाश हेगडे हे नोव्हेंबरमध्ये सादर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल,असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हैसूरमध्ये बोलताना म्हणाले की,“आमचा समाज जातिव्यवस्थेवर आधारित आहे.प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता दिली पाहिजे. त्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी हवी आहे.त्यासाठी आम्ही जातीनिहाय जनगणना केली होती.जातनिहाय जनगणना झाली,तेव्हा कांतराजू हे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते.मात्र कांतराजू अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी स्वीकारला नाही.आता विद्यमान अध्यक्षांशी चर्चा केली आहे. ते नोव्हेंबरमध्ये अहवाल देणार आहेत. अहवाल सरकारच्या हाती आल्यानंतर निर्णय घेऊ. सरकारी योजना सर्वस्तरातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी जात आणि सामाजिक जनगणना आणि त्याची आकडेवारी आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top