कर्नाटकमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मास्कसक्ती

बंगळुरु

चीनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू जेएन-१ चे रुग्ण आढळल्यानंतर केरळमध्ये देखील या विषाणूचा रुग्ण आढळला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करण्यात येणार आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी काल कर्नाटकमधील उपाययोजनांची माहिती दिली. यासंदर्भात आज कर्नाटक आरोग्य विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करणार असल्याची माहिती राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राव यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या विषाणूचा रुग्ण केरळमध्ये आढळला असून कर्नाटकमध्येही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. मात्र, यामुळे नागरिकांना घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. आत्ता सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांसाठी मास्कसक्ती लागू करण्यात आलेली नाही. पण जर करोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तर आपल्याला अशी नियमावली लागू करावी लागेल. मात्र, सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. मी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये यासंदर्भात चर्चा केली आहे. यासंदर्भातील समितीने ज्येष्ठ नागरिक व हृदयाशि निगडित आजार असणाऱ्या व्यक्तींना मास्कसक्ती करण्याची शिफारस केली आहे. कर्नाटक-केरळ सीमेवर या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top