कर्नाटकात अपघात ७ जणांचा मृत्यू

बंगळुरू

कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील गुंडा जंगलाजवळ दोन ट्र्क आणि कारचा भीषण अपघात झाला. यात एका ५ वर्षांची मुलगी आणि तीन महिलांसह ७ जणांचा मृत्यू झाला, तर दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले. त्यांना होस्पेटमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल संध्याकाळी हा अपघात झाला.
कारला धडक देणारा ट्र्क चित्रदुर्गाकडून होस्पेटला जात होता. गुडाच्या जंगलाजवळ ट्रक आला असताना ट्रकची स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे हा ट्रक अनियंत्रित झाला आणि विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये घुसला. त्याचवेळी एक कार हरपनहल्लीहून हॉस्पेटच्या दिशेने जात होती. या कार आणि ट्रकची धडक झाली. त्यानंतर मागून येणाऱ्या आणखी एका ट्रकने त्या कारला मागून धडक दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top