कल्याणचा उमेदवार भाजपच ठरवणार! श्रीकांत शिंदेंवर भाजप आमदाराचा बॉम्ब

कल्याण- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना जागावाटपावरुन राजकीय पक्षांत वादावादी सुरू आहेत. त्यात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी बॉम्ब फोडला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजपाचेच पक्षश्रेष्ठी ठरवणार असल्याचे गणपत गायकवाड यांनी आज सांगितले.
गणपत गायकवाड यांनी सांगितले की,कल्याणमध्ये भाजपचा उमेदवार असेल की खासदार श्रीकांत शिंदे असतील हे भाजपाचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. आमचा पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याचे आम्ही काम करणार आहोत. कल्याण लोकसभा मतदारसंध हा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या 25 वर्षात भाजपची पीछेहाट होत गेली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी कल्याणमध्ये आम्हाला ताकद दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामुळे आमचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत झाला. या ठिकाणी जो उमेदवार असेल तो 100 टक्के निवडून येणार आणि तो पण आमचाच उमेदवार असेल. मी तीन वेळा या परिसरात आमदार झालेे. मला खासदारकीची इच्छा नाही. मी आमदार असताना ज्या गोष्टी शिकलो, त्या विकासासाठी उपयोगी पडणार आहेत. मी खासदार बनलो, तर पुन्हा हा मतदारसंघ पाठीमागे जाईल, मला पुन्हा खासदारकीचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मला खासदारकीची इच्छा नाही आणि मी खासदाकीच्या रेसमध्ये नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top