कल्याण तळोजा मेट्रोचे काम वेगात

कल्याण
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने कल्याण ते तळोजा मेट्रो १२ प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवला असून कल्याणच्या एपीएमसी बाजारपेठेत व डोंबिवलीतील अनेक ठिकाणी या मेट्रोच्या पिलरचे काम सुरू केले आहे.
कल्याण ते तळोजा या मेट्रो प्रकल्प १२ चे काम आता वेगात सुरू करण्यात आले असून या कामासाठी ५ हजार ८६५ कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यात झाले होते. सुरुवातीला डोंबिवलीच्या एकाच जागेवर या मेट्रोचे काम सुरू करण्यात आले होते. आता मात्र कल्याणच्या एपीएमसीच्या बाजाराच्या आवारात व डोंबिवलीतील इतर अनेक ठिकाणी या मेट्रोच्या पिलरच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प हा २२ किलोमीटर लांबीचा असून या मार्गात २२ स्थानके प्रस्तावित आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गावर दररोज जवळजवळ अडीच लाख लोक प्रवास करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे कल्याण ते ठाणे या उपनगरी रेल्वेवर पडणारा ताण कमी होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top