कवठेमहांकाळ तालुक्यातील पहिला जलतरण तलाव सुरू

सांगली- कवठेमहांकाळ तालुक्यातील पहिला जलतरण तलाव शहरातील विद्यानगर येथे एस.बी.जी क्लबने सुरू केला आहे. सुमारे २५ लाख रुपये खर्चून हा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे.

या जलतरण आकार २५× ५० फुट असा आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवानेते वैभव गुरव यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब गुरव ज्युनियर कॉलेजच्या क्रीडांगणावर हा जलतरण तलाव उभारण्यात आला आहे.मुले,मुली,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. सर्व सोयींनी सुसज्ज आणि विशेष नियमावली वापरला जाणारा असा हा तालुक्यातील पाहिलाच जलतरण तलाव आहे. क्लबचे प्रमुख पवनपुत्र जकाते,मानसिंग दळवी, जगन्नाथ माने आणि विजय मोहिते आदींजण या जलतरण तलावाचे नियोजन पाहत असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top