काँग्रेसकडून २०२२-२३ मध्ये भारत जोडो यात्रेवर ७१.८ कोटींचा खर्च

नवी दिल्ली

काँग्रेसने २०२२-२३ साली कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे आयोजन केले होते. ३० जानेवारी २०२३ मध्ये काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेची सांगता झाली. या यात्रेवर काँग्रेसने एकूण ७१.८ कोटी रुपयांचा खर्च केला. ह्या यात्रेचा कालावधी एकूण १४५ दिवसांचा होता. या १४५ दिवसांच्या यात्रेत काँग्रेसकडून दररोज सुमारे ४९ लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला.

काँग्रेसने पक्षाच्या निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या नवीनतम वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार- आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निवडणूकपूर्व सर्वेक्षणांवर ४०,१०,१५,५७२ रुपये खर्च केले. हा खर्च मागील आर्थिक वर्षातील खर्चापेक्षा अधिक आहे. २०२२-२३ मध्ये पक्षाचा निवडणूक खर्च १९२.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. हा खर्च जो गेल्या आर्थिक वर्षातील २७९.५ कोटी रुपयांपेक्षा कमी होता. पक्षाने २०२२ मध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश आणि २०२३ च्या सुरुवातीला त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये निवडणुका लढवल्या. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने विजय मिळविला. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी काँग्रेसला ४५२.३ कोटी रुपये मिळाले, जे गेल्या आर्थिक वर्षातील ५४१.२ कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत.

२०२२-२३ या आर्थिक वर्षा या आर्थिक वर्षासाठी काँग्रेस पक्षाचा खर्च ४६७.१३ कोटी रुपये होता. काँग्रेसला २६८.६ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती, जी गेल्या वर्षी ३४७.९ कोटी रुपयांपेक्षा कमी होती. काँग्रेसने २०२२-२३ मध्ये रायपूरमधील पूर्ण अधिवेशनावर ५८.८ लाख रुपयांचा खर्च केला होता. काँग्रेसने २०२२-२३ या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे आयोजन केले होते. हा प्रवास १४५ दिवसांचा होता. या भारत जोडो यात्रेवर काँग्रेसने दररोज सरासरी ४९,२०,५२२ रुपये खर्च केला. या १४५ दिवसांच्या यात्रेत काँग्रेसने एकूण ७१,८३,९६,२७० कोटी रुपये खर्च केले. ३० जानेवारी २०२३ मध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सांगता झाली. हा १४५ दिवसांचा प्रवास ४ हजार किलोमीटरचा होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top