काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. पी विश्वनाथन यांचे निधन

तिरुवनंतपुरम :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के. पी विश्वनाथन यांचे आज सकाळी त्रिशूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांनी आयुष्यातील ६० वर्षे राजकारणात घालवली. विश्वनाथन यांनी काँग्रेसचे सदस्य म्हणून राज्य विधानसभेत कुन्नमकुलम आणि कोडकारा या जागांचे प्रतिनिधित्व केले. केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए. एन. शमसीर यांनी विश्वनाथन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

विश्वनाथन यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १९६७ ते १९७० या काळात त्यांनी त्रिशूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९७२ मध्ये ते केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सक्रिय सदस्य झाले. विश्वनाथन १९७७ आणि १९८० मध्ये कुन्नमकुलम मतदारसंघातून त्यानंतर १९८७, १९९१, १९९६ आणि २००१ मध्ये कोडकारा या मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडून आले. यांनतर सप्टेंबर २००४ ते फेब्रुवारी २००५ पर्यंत ओमन चंडी सरकारमध्ये वनमंत्री होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top