कांदा निर्यातीवर ३१ मार्चपर्यंत बंदी

नवी दिल्ली –

स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते, मात्र आज पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली. त्यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंद राहणार आहे. दरम्यान, गेल्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने आणि काढणीला आलेल्या कांद्याला अवकाळीचा फटका बसल्याने कांदा आवक घटली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top