कांद्याची आवक वाढूनही दर वधारले चाकणला पालेभाज्यांची भरपूर आवक

चाकण :
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा, वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक वाढली. बटाट्याची आवक व भाव स्थिर राहिले. लसणाची आवक स्थिर राहिल्याने भावात वाढ झाली. फळभाज्यांच्या बाजारात कोबी, फ्लॉवर, वांगी व भेंडीची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक वाढली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हशींच्या संख्येत मोठी वाढ झाली. शेळ्या – मेंढ्यांची संख्या घटून भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी, ५ लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५० क्विंटलने वाढून भावात ९०० रुपयांची उच्चांकी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ३,५०० रुपयांवरुन ४,४०० रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमुग शेंगा व बंदूक भुईमुग शेगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावात १ हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव १५ हजार रुपयांवरून १६ हजार रुपयांवर पोहोचला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३९३ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २ क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला १,५०० रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top