काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोनेरी वाघाचे पुन्हा दर्शन

दिसपूर :

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ गोल्डन टायगर म्हणजेच सोनेरी वाघाचे पुन्हा एकदा दर्शन झाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी नुकताच आढळून आलेल्या सोनेरी वाघाचा फोटो शेअर केला. ‘राजेशाही थाट! काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक दुर्मिळ सोनेरी वाघ दिसला,’ असे कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात २०२३ मध्ये सोनेरी वाघ दिसला होता. त्यानंतर नुकतेच पुन्हा त्याचे काझीरंगात दर्शन झाले.

गोल्डन टायगर, ज्याला गोल्डन टॅबी टायगर असेदेखील म्हटले जाते. हा विशिष्ट रंग भिन्नतेचा एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. काझीरंगा हे बंगाल टायगर आणि बिबट्यांसह मोठ्या मांजर कुळातील अनेक काही वन्य प्रजनन क्षेत्रासाठी सुरक्षित अधिवास म्हणून ओळखला जातो. सध्या येथे वाघांची घनता सर्वाधिक आहे. आसाममध्ये वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ताज्या सरकारी , आसाममध्ये २२७ वाघ आहेत. राज्यात २००६ मध्ये ७० वाघ होते. २०१० मध्ये ही संख्या १४३ वर पोहोचली. २०१४ मध्ये वाघांची संख्या १६७ वर गेली. २०१८ मध्ये ती १९० आणि २०२२ मध्ये २२७ होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top