Home / News / कानपूरमध्ये दिव्यामुळे घराला आग! पती-पत्नीसह मोलकरीणीचा मृत्यू

कानपूरमध्ये दिव्यामुळे घराला आग! पती-पत्नीसह मोलकरीणीचा मृत्यू

कानपूर – कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी मंदिरातील दिव्यामुळे घराला भीषण आग लागली. त्यात व्यापारी पती-पत्नीसह मोलकरीणीचा होरपळून मृत्यू झाला. पूजा केल्यानंतर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कानपूर – कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी मंदिरातील दिव्यामुळे घराला भीषण आग लागली. त्यात व्यापारी पती-पत्नीसह मोलकरीणीचा होरपळून मृत्यू झाला. पूजा केल्यानंतर पती-पत्नी मंदिरात दिवा लावून झोपी गेले.

संजय श्याम दासानी (४८), पत्नी कनिका दासानी (४२) आणि मोलकरीण छवी चौहान (२४) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. त्यांची अंबाजी फूड्स नावाची बिस्किट कंपनी आहे. आगीमुळे घरातील स्वयंचलित दार लॉक झाले. त्यामुळे पती-पत्नी बेडरूममध्ये अडकले. मुलगा पार्टीवरून परतला तेव्हा त्याला घरातून धूर निघत असल्याचे दिसून आला. त्याने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथकही पोहोचले. आग विझवल्यानंतर घऱातून पती, पत्नी आणि मोलकरणीला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

Web Title:
संबंधित बातम्या