काळाचौकी परिसरातील पालिका शाळेत सिलेंडर स्फोट

मुंबई

मुंबईतील काळाचौकी येथील मिंट कॉलनी परिसरातील मुंबई महापालिकेच्या साईबाबा पथ या शाळेत आज सकाळी ६ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुामारास हा भीषण स्फोट झाला. या घटनेत कोणातीही जिवीतहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल २ ते ३ तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मुंबई महापालिकेची साई बाबा पथ ही शाळा मागील ३ वर्षापासून बंद आहे. अतिधोकादायक इमारत असल्यामुळे ती बंद करण्यात आली होती. कोरोनाकाळात या शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. त्यावेळचे सिलेंडर इथून हटवण्यात आले नव्हते. त्यांचाच स्फोट झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की बराच काळ शाळेतून धुराचे लोट येत होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top