काश्मीरमध्ये टॅक्सी नदीत कोसळली ४ पर्यटकांचा मृत्यू ! दोघे बेपत्ता

श्रीनगर

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांनी भरलेली एक टॅक्सी नदीत कोसळली. या अपघातात ४ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी आणि आणखी २ जण बेपत्ता झाले. आहेत. या टॅक्सीमध्ये एकूण नऊ पर्यटक होते. टॅक्सी चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या भागात वाहून गेलेल्या पर्यटकांना शोधण्याचे काम सुरु आहे.

काल श्रीनगरमधील सोनमर्गजवळ हा भीषण अपघात झाला. सिंध नदीजवळून जाताना पर्यटकांची टॅक्सी बर्फाळ रस्त्यावरून घसरली. टॅक्सी नियंत्रणाबाहेर गेल्याने नदीत पडल्याचे सांगितले जाते. यावेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने टॅक्सीमधील पर्यटक वाहून गेले. नदीचा प्रवाह जोरदार असल्याने शोधमोहीमेत अनेक अडचणी येत आहेत. सतत सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे आणि पावसामुळे नदीच्या पाणीच्या पातळीत वाढ होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top