काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच उत्तर भारतातही थंडी वाढली

श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून गुलमर्ग या पर्यटनस्थळावर बर्फाची पांढरी चादर पसरली. कोंगदोरी परिसरात पारा उणे 4 अंशांवर पोहोचला. बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
राजस्थानच्या माउंट अबूमध्ये पारा उणे 1 अंशावर पोहोचला. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये थंडी वाढली आहे. झारखंडमध्ये हवामानात सातत्याने बदल होत असून जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा घसरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. रांचीला लागून असलेल्या कानकेचे किमान तापमान चार अंश सेल्सिअसवर पोहोचले. उत्तर प्रदेशाच्या काही शहरांमध्ये तापमान 5 अंशांपर्यंत खाली आले. बरेलीमध्ये 4.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अयोध्येतील तापमान 5.5 अंश सेल्सिअस होते. पुढील 7 दिवसांत उत्तर प्रदेशातील तापमान 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top