काश्मीरमध्ये बर्फ नसल्याने पर्यटकांचे बुकिंग रद्द

श्रीनगर

काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात यंदा हिवाळ्यात बर्फवृष्टी झाली नाही. काश्मीर खोऱ्यात अत्यल्प पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

अनेक पर्यटक हिवाळी सुट्टीत काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये जातात. मात्र, यंदा बर्फवृष्टी न झाल्याने पर्यटकांनी त्यांचे बुकिंग रद्द केले. काश्मीरचे अर्थकारण हे मुख्यत: पर्यटनावर अवलंबून असते. काश्मीरमध्ये पडणारा बर्फ हा पर्यटनासोबतच स्थानिक हवामान, हिवाळी शेती, काश्मिरी सफरचंद आणि इतर फळे यासाठीदेखील महत्वाचा असतो. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये पाऊस किंवा बर्फ पडला नाही. डिसेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये ७९ टक्के पाऊस कमी झाला. अन्य राज्यात २४ जानेवारीपर्यंत ९९ टक्के पाऊस कमी झाला. मात्र, आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होईल. तसेच पश्चिम हिमालयाच्या काही भागातदेखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व बर्फ पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top