पंढरपूर – देशभरातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपुरातील कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात आज पहाटे चोरी झाल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत चोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली.
चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून देवीची चांदीची मूर्ती, चांदीच्या पादुका, चांदीची प्रभावळ असे १० लाखांचे दागिने लंपास केले. पहाटे पाच वाजता पुजारी मंदिरात आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. पुजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून मंदिराचे सीसीटीव्ही बंद आहेत.