Home / News / किल्ले राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात २० ते २५ पर्यटक जखमी

किल्ले राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात २० ते २५ पर्यटक जखमी

पुणे – किल्ले राजगडावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीवाच्या आकांताने गडावरुन खाली धाव...

By: E-Paper Navakal

पुणे – किल्ले राजगडावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीवाच्या आकांताने गडावरुन खाली धाव घेतली. तर काहींनी स्वतःला वाचवण्यासाठी गडावर असलेल्या पद्मावती तळ्यात उड्या घेतल्या. मधमाशांच्या हल्ल्यात २० ते २५ पर्यटक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.मुंबईवरून आणि बारामती येथून काही पर्यटक किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आले होते. यावेळी गडाजवळ असलेल्या पोळावरील मधमाशा चवताळून उठल्या. मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला करत त्यांना चावा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे गडावर मोठा गोंधळ उडाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे आणि विशाल पिलावरे यांनी पर्यटकांना पुरातत्व विभागाच्या कार्यालयामध्ये आसरा दिला. यामध्ये प्रथम अहिरे (२४) याला मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने तो जखमी झाला. मधमाशा चावताना प्रथम अहिरे हा गडावरुन खाली पळताना दोन ते तीन ठिकाणी तोल जाऊन पडला. किल्ला अर्धा उतरल्यानंतर त्याला उलटीचा त्रास होऊ लागला आणि चक्कर देखील आली. या हल्ल्यात २० ते २५ पर्यटक जखमी झाले.

Web Title:
संबंधित बातम्या