कुनो अभयारण्यात मादी चित्ता ज्वालाने ३ पिल्लांना जन्म दिला

भोपाळ

मध्य प्रदेशातील शिवपुर येथील कुनो अभयारण्यामध्ये ज्वाला नावाच्या नामिबियन चित्त्याने आज ३ पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे सध्या तिथे आनंदाचे वातावरण आहे. या पिल्लांना एका मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. तेथे डॉक्टर त्यांच्यावर देखरेख ठेवत आहेत. याआधीही ज्वाला चित्ताने ४ पिल्लांना जन्म दिला होता. यातील ३ शावकांचा मृत्यू झाला.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. भूपेंद्र यादव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘कुनो अभयारण्यात ३ नवीन सदस्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. नामिबियातून आणलेल्या ज्वाला या मादी चित्ताने ३ पिल्लांना जन्म दिला आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व तज्ञ, कुनो राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी आणि संपूर्ण देशातील वन्यजीव प्रेमींना माझ्या शुभेच्छा.’ कुनो अभयारण्यात आता चित्त्यांची संख्या १७ झाली आहे. यात ७ शावकांचाही समावेश आहे. सुमारे महिनाभरापूर्वी नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता आशा ने ३ पिल्लांना जन्म दिला होता. याआधी मार्च २०२३ मध्येही मादी चित्ता ज्वालाने ४ शावकांना जन्म दिला होता. त्यातील तिघांचा काही महिन्यांतच मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top