कुलगाममध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

श्रीनगर –
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून आज चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले. कुलगामच्या रेडवानी पाइन भागात गेल्या १२ तासांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. दहशतवादी कुठून आले, कोण आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री ११ वाजताच्या सुमारास सुरक्षा दलांनी कुलगामच्या रेडवानी भागाला वेढा घातला होता. शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. मृत दहशतवाद्यांमध्ये लष्करे तैबाचा वरिष्ठ कमांडर बासीत अहमद डारचा समावेश आहे. २८ एप्रिल रोजी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढ येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात व्हिलेज डिफेन्स गार्ड मोहम्मद शरीफ यांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम राबवली होती. दहशतवाद्यांच्या माग काढण्यासाठी यत्रणांनी कठुआ जिल्ह्यातही शोधमोहीम सुरू केली होती.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (जम्मू प्रदेश) आनंद जैन यांनी सांगितले की, सीमेपलीकडून घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांचे दोन गट या भागात होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top