कुवेतचे वयोवृद्ध राजपुत्र अमीर शेख नवाफ यांचे निधन

दुबई- कुवेतमधील सत्ताधारी अमीर शेख नवाफ अल-अहमद अल सबाह यांचे काल निधन झाले. वैद्यकीय कारणांमुळे त्यांना नोव्हेंबरमध्ये रुग्णालयात दाखल केले होते.त्यांच्या निधनाची बातमी येण्यापूर्वी कुवेत टीव्हीवर कुराणातील आयतांचे पठण करण्यात आले.शेख नवाफ यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ ८३ वर्षांचे शेख मेशाल अल अहमद अल जाबेर हे त्यांचे उत्तराधिकारी बनले आहेत.ते जगातील सर्वांत वयोवृद्ध राजपुत्र असल्याचे मानले जाते.

अमीर शेख नवाफ यांना त्यांचा सावत्र भाऊ शेख सबाह अल-अहमद अल-सबाह यांनी २००६ मध्ये युवराज म्हणून नियुक्त केले होते.यानंतर,२०२० मध्ये शेख सबाह अल अहमद अल सबाह यांच्या निधनानंतर त्यांनी अमीर म्हणून शपथ घेतली होती. शेख नवाफ हे त्यांच्या मुत्सद्देगिरीसाठी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ओळखले जात होते.देशाचे अमीर
बनण्यापूर्वी त्यांनी कुवेतचे इंटीरियर आणि संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले होते. मात्र त्यांचा सक्रिय सहभाग सरकारमध्ये दिसला नाही. अमीर पदासाठी ते एक वादग्रस्त चेहरा असले तरी शेख नवाफ यांनी आपल्या कार्यकाळात प्रामुख्याने देशांतर्गत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते. नवाफ यांच्या निधनामुळे ४० दिवसांच्या अधिकृत शोक कालावधीची आणि सरकारी विभाग तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top