Home / News / कुवैतमध्ये लग्नानंतर ३ मिनिटात घटस्फोट

कुवैतमध्ये लग्नानंतर ३ मिनिटात घटस्फोट

कुवैत – लग्नानंतर काही वर्षांनी किंवा काळाने घटस्फोट होण्याची अनेक प्रकरणे घडत असतात. कुवैतमध्ये मात्र एका जोडप्याचा लग्नानंतर केवळ ३...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कुवैत – लग्नानंतर काही वर्षांनी किंवा काळाने घटस्फोट होण्याची अनेक प्रकरणे घडत असतात. कुवैतमध्ये मात्र एका जोडप्याचा लग्नानंतर केवळ ३ मिनिटात घटस्फोट झाला आहे.कुवैतमधील एक जोडपे न्यायालयात विवाह करण्यासाठी गेले. विवाहानंतर ते घरी जायला निघाले असतांना पतीने पत्नीला उद्देशून मूर्ख असा शब्द वापरला. त्याचा मुलीला राग आला व तिने त्वरित माघारी फिरत न्यायालयाला हे लग्न रद्द करण्याची विनंती केली. न्यायालयानेही तिची बाजू ऐकून घेऊन तिच्या घटस्फोटाला परवानगी दिली. कुवैतच्या इतिहासात सर्वात कमी काळ टिकलेला विवाह म्हणून या लग्नाची नोंद झाली आहे. वास्तविक ही घटना २०१९ सालची आहे. मात्र सध्या ती समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. त्यावर प्रतिक्रियांचाही पाऊस पडत असून अनेकजण आपापले अशा प्रकारचे अनुभव शेअर करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या