कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम ४७ दिवसांत ५ लाख मेट्रिक टन गाळप

कराड – रेठरे बुद्रुक परिसरातील शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२३-२४ या गळीत हंगामात वेगळी कामगिरी करून दाखविली आहे. केवळ ४७ दिवसांत या कारखान्याने ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे.कारखान्याच्या इतिहासातील हा नवा विक्रम आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा ६४ वा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे.या कारखान्याने यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी अवघ्या ४ महिन्यात कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याचे काम केले आहे. यामुळे कारखान्याची क्षमता वाढून ती प्रतिदिन १२,००० मेट्रीक टन झाली आहे. याच महिन्यात ६ डिसेंबर रोजी कारखान्याने गाळप क्षमतेहून जास्त गाळप करत १२,४५० मेट्रीक टन उच्चांकी गाळपाचा टप्पा पूर्ण केला.याच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत, कारखान्याने अखेर ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करुन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.या कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प,आसवणी आणि इथेनॉल प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top