कॅनडाच्या पंतप्रधानांच्या समोरच ‘खलिस्तान समर्थनार्थ’ घोषणा

टोरंटो- कॅनडातील टोरंटो येथे नुकताच खालसा दिन साजरा करण्यात आला. यावेळी शीख समुदयाचे लोक मोठ्या संख्येने जमले होते.या कार्यक्रमात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या भाषणात आम्ही तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत,असे म्हणताच उपस्थित लोकांनी खलिस्तान समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली.दरम्यान, या प्रकाराबद्दल भारताने कॅनडाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

खालसा दिन उत्सव हा कॅनडातील सर्वात मोठा वार्षिक उत्सव मानला जातो आणि त्यासाठी मोठ्या संख्येने शीख समुदयाचे लोक जमतात.कॅनडात आठ लाख शीख समुदायाचे लोक आहेत, ज्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. शीख समुदायाच्या हिताचे आम्ही संरक्षण करु,शीख सुमदयातील नागरिकांनी घाबरू नये,असे आवाहन यावेळी ट्रुडो यांनी केले. त्यानंकर या कार्यक्रमात ‘खलिस्तान’ समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

या कार्यक्रमानंतर भारत सरकारने कॅनडाच्या उप उच्चायुक्तांना बोलावून त्यांच्याकडे आपला निषेध नोंदवला.तसेच याप्रकरणी कॅनडाच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top