कॅनडाने भारतातील ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले

ओटावा- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग याच्या हत्येचा आरोप केल्याने दोन्ही देशात तणाव वाढला असतानाच आता कॅनडाने त्यांच्या भारतातील ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी काल याबाबत माहिती दिली. भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास त्यांचा राजनैतिक दर्जा रद्द करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. भारताचे हे पाऊल अयोग्य असून राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे, अशी टीकाही त्यांनी केली. भारताच्या या कारवाईमुळे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही त्यांना भारतातून परत बोलावले आहे. ‘जर आपण राजनैतिक प्रतिकारशक्तीसाठी बनवलेले नियम मोडू दिले तर जगातील एकही मुत्सद्दी सुरक्षित राहणार नाही. या कारणास्तव, आम्ही भारताच्या कारवाईला कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे जोली यांनी स्पष्ट केले. भारत सोडून गेलेल्या ४१ मुत्सद्दी लोकांसोबत त्यांच्या कुटुंबातील ४२ लोकही आहेत. हरदीप सिंह निज्जरची जूनमध्ये सरे शहरातील गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी कॅनडाच्या सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. या हत्येत भारताचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो संसदेत आले आणि भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला. तसेच, ओटावा येथे उपस्थित असलेल्या भारताच्या सर्वोच्च मुत्सद्द्याला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले, असे ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top