कॅन्सर च्या उपचारानंतर किंग चार्ल्स पुन्हा कार्यरत

लंडन
इंग्लडचे राजे किंग चार्ल्स तृतीय हे कॅन्सरचे उपचार घेतल्यानंतर कालपासून पुन्हा कार्यरत झाले आहेत. त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही सुरुवात केली आहे. आज त्यांनी एका कॅन्सर उपचार व पुर्नवसन केंद्राला भेट देऊन आपल्या कार्यक्रमांना सुरुवात केली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना कॅन्सरचे निदान झाल्यापासून उपचार सुरु असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाण्याचे टाळले होते.
मंगळवारी त्यांनी पहिल्यांदा लंडनमधील कॅन्सर उपचार केंद्राला भेट दिली व तिथल्या रुग्णांशी संवाद साधला. तीस वर्षांपासून चार्ल्स या कॅन्सर केंद्राला सहाय्य करत आहेत. त्यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. चार्ल्स च्या पत्नी कॅमेला या कॅन्सर उपचार व पुर्नवसन केंद्राच्या २००८ पासून अध्यक्ष आहेत. ७५ वर्षीय किंग चार्ल्स हे कॅन्सरच्या उपचारादरम्यान लोकांपासून दूर राहिले होते. ते केवळ काही वेळा चर्चमध्ये गेले होते त्याचप्रमाणे इस्टर संडेच्या दिवशी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले होते. किंग चार्ल्स यांनी आपल्या उपचारांना चांगली साथ दिली त्यामुळे ते आता त्यातून बाहेर आले असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. किंग चार्ल्स यांनीही आज कॅन्सर रुग्णांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. एका महिला रुग्णाबरोबर गप्पा मारतांना त्यांनी स्वतःवरच्या उपचारांचीही माहिती दिली. यावेळी त्यांनी या उपचार केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांसोबतही गप्पा मारल्या. चार्ल्स यांची ही भेट फार सकारात्मक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top