कॅलिफोर्नियातील ११ बिलियन डॉलरचा पूल! चेष्टेचा विषय ठरला

कॅलिफोर्निया –

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सरकारने एक असा पूल बनवला, जो कुठल्याच मार्गाला जोडत नाही. या पुलासाठी तब्बल ११ बिलियन डॉलर इतका खर्च आला आहे. हा पूल बांधण्यासाठी ९ वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे हा पूल सध्या जागतिक पातळीवर चेष्टेचा विषय ठरला आहे. हा पूल सॅन फ्रान्सिस्कोला लॉस एंजलिसला जोडण्याच्या उद्देशाने आणि बुलेट ट्रेनचा एक भाग म्हणून उभारण्यात आला होता.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क आणि डॉजकॉईनचे फाऊंडर बिली मार्कस यांनी या प्रकल्पाची खिल्ली उडवली आहे. मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दुःखी, रडणारा इमोजी शेअर करत निराशा व्यक्त केली आहे. बिली मार्कस यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये, “ही आजवरची सर्वात मोठी मानवी उपलब्धी आहे. तब्बल ९ वर्षांनंतर १,६०० फूट हायस्पीड रेल्वे आणि ११ अब्ज डॉलर्स खर्च. १६०० फूट चालण्यासाठी तब्बल ५ मिनिटे लागतात, असे म्हणत त्यांनी चिमटा काढला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top