Home / Top_News / केजरीवाल यांच्या याचिकेवर ईडीला उत्तर देण्याची नोटीस

केजरीवाल यांच्या याचिकेवर ईडीला उत्तर देण्याची नोटीस

नवी दिल्ली – आपल्यावर सध्या विविध न्यायालयात ३५ खटले सुरु असून त्यासाठी कारागृहात आठवड्यातून चार दिवस वकीलांची भेट देण्याची परवानगी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – आपल्यावर सध्या विविध न्यायालयात ३५ खटले सुरु असून त्यासाठी कारागृहात आठवड्यातून चार दिवस वकीलांची भेट देण्याची परवानगी द्यावी अशी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर तिहारचे तुरुंग अधिकारी व ईडीने आपले म्हणणे मांडावे अशी नोटीस उच्च न्यायालयाने जारी केली आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल क्रिष्णा यांच्या पीठाने ही नोटीस जारी केली असून ७ दिवसांच्या आत उत्तर द्यायला सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १५ जुलै रोजी होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या