केजरीवाल यांना अखेर इन्शुलीन दिले

नवी दिल्ली –

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या साखरेची पातळी वाढल्याने अखेर काल त्यांना इ्न्शुलीन देण्यात आले. मधुमेहाचा त्रास असल्याने इन्शुलीन तसेच डॉक्टरांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी केजरीवाल यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला होता. परंतु ईडीने केजरीवाल आंबे व गोड पदार्थ खाऊन जाणीवपूर्वक साखरेची पातळी वाढवत असल्याचा आरोप केला होता. काल न्यायालयाने केजरीवाल यांची मागणी फेटाळत इन्शुलीन देण्याचा निर्णय एम्सच्या डॉक्टरांवर सोपवला होता. केजरीवाल यांना इन्शुलीन व औषधोपचार दिले जात नसल्याने आपकडून भाजपावर अनेक आरोपही करण्यात आले. काल केजरीवाल यांची साखरेची पातळी ३२० वर गेल्याने अखेर तुरुंग प्रशासनाने त्यांना इन्शुलीन दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top