केटामाइनच्या अतिसेवनाने अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृत्यू

  • शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट

लॉस एंजेलिस

अमेरिकन-कॅनेडियन अभिनेता मॅथ्यू पेरी याचा केटामाइनच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले आहे. २८ ऑक्टोबर रोजी मॅथ्यूचा मृतदेह लॉस एंजेलिसमधील त्याच्या घराच्या हॉट टबमध्ये सापडला होता. त्याचे वय ५४ वर्षे होते. तो जगातील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांपैकी एक होता.

याबाबत लॉस एंजेलिस काउंटी विभागाच्या डॉक्टरांनी म्हटले की, मॅथ्यू पेरी केटामाइन इन्फ्युजन थेरपी घेत होता. त्याचा वापर नैराश्यावर उपचार करण्यासाठी केला जातो. मृत्यूपूर्वी दीड आठवडा आधी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या शरीरातील केटामाइनची पातळी सामान्य भूल देण्यापेक्षा कमी होती. हे औषध सहसा काही तासांत पचते. मात्र, त्याच्या शरीरात त्याचे काही अंश आढळले होते. मॅथ्यू केटामाइनमुळे बेशुद्ध झाला आणि त्यामुळे तो स्वतःला वाचवू शकला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top