केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा

पुणे – दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ५० वर्ष पुर्ण झाल्याने केक कापून या इमारतीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ब्रिटीशकालीन सुरू झालेल्या पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील केडगाव हे जुने स्थानक असून या ठिकाणाहून रेल्वेचा एकेरी मार्ग जात होती. १९७३ मध्ये जुन्या रेल्वे स्थानक स्थलांतरित करण्यात आले होते.

तत्कालीन आमदार उषाताई जगदाळे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. आज त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश मार्गावर रंगी बेरंगी फुग्यांची कमान लावण्यात आली होती. परिसराची स्वच्छता रोजच्यांपेक्षा चांगली करण्यात आली होती. दरम्यान, ब्रिटिश कालीन राजवटीतील या रेल्वे स्थानकाचा निर्माण करण्यासाठी मागचा मूळ हेतू पंडिता रमाबाई यांचाच होता. त्यांची जागतिक पातळीवरती असलेले विधवा, मतिमंद, अपंग या महिलांचा आश्रम या ठिकाणी आहे आणि या आश्रमाला भेट देण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना रेल्वेची सोय व्हावी यासाठी स्थानकाचे निर्माण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी काही ज्येष्ठ प्रवाशांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top