केदारनाथ धाम आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले

डेहराडून

उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे अक्षय्य तृतियाच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच उद्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहेत. यानिमित्त उद्या पूजा आणि वैदिक मंत्रोच्चाराने मंदिर उघडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु असून केदारनाथ मंदिर ४० क्विटल फुलांनी सजवले जात आहे. भगवान केदारनाथची पंचमुखी डोली सोमवारी श्री विश्वनाथ मंदिर गुप्तकाशी येथून देवडोली मुक्कामासाठी श्री ओंकारेश्वर मंदिर उखीमठ येथे पोहोचली. मंगळवारी ही डोली फाटा येथे दुसऱ्या मुक्कामासाठी पोहचली. त्यानंतर काल सकाळी फाटा येथून गौरीकुंड येथे पंचमुखी डोली तिसरा मुक्काम करणार आहे. भगवान केदारनाथची पंचमुखी डोली आज सकाळी ८.३० वाजता गौरामाई मंदिर गौरीकुंड येथून निघाली असून ती उद्या सकाळी ७ पर्यंत केदारनाथ धाम येथे पोहचणार आहे. सकाळी ७ च्या दरम्यान केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडणार असून, यावेळीपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे, असेही मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top