केदारनाथ-बद्रीनाथ परिसरात जोरदार बर्फवृष्टी! तापमान घसरले

रुद्रप्रयाग – केदारनाथ आणि बद्रीनाथसह चारधाम परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे हेलिपॅडवर दीड फूट बर्फ साचल्याने शनिवारी येथील हवाईसेवा पूर्णपणे ठप्प होती. या परिसरातील तापमानाचा पारा घसरला असून थंडीचा जोर वाढला आहे.
चमोली, हेमकुंड साहिब, औली, केदारनाथ, बद्रीनाथ धाम क्षेत्रात शुक्रवारपासून बर्फवृष्टी होत आहे. शिवाय उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री व यमुनोत्री धाम परिसरातही बर्फ पडतत आहे. त्यामुळे थंडी वाढली असली तरी पर्यटक त्याचा आनंद घेत आहेत.
पुढील चोवीस तासांत राज्यातील बागेश्वर आणि पिथोरागडमधील काही भागांत पाऊस आणि गारा कोसळण्याचा अंदाज आहे. मैदानी भागातील हवामान शुष्क असेल, असे हवामान विज्ञान केंद्राचे संचालक बिक्रमसिंह यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top