Home / News / केदारनाथ मंदिर सहा महिने दर्शनासाठी बंद राहाणार

केदारनाथ मंदिर सहा महिने दर्शनासाठी बंद राहाणार

चमोली- दरवर्षीप्रमणे भाऊबीजच्या दिवशी यंदाही केदरनाथचे दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता लष्करी बँड आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात बंद करण्यात आले....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

चमोली- दरवर्षीप्रमणे भाऊबीजच्या दिवशी यंदाही केदरनाथचे दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता लष्करी बँड आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात बंद करण्यात आले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसराला १० क्‍विंटल फुलांनी सजवले होते. आज हजारो भाविक केदारनाथ दर्शनासाठी मंदिरात आले होते. त्यानंतर केदारनाथच्या पंचमुखी मूर्तीला चल विग्रह डोलीतून उखीमठसाठी रवाना करण्यात आले. ही चल विग्रह डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर येथे पोहोचेल. त्यानंतर गौरीकुंड येथून सोनप्रयागमार्गे ती रात्री रामपूर येथे विसावणार आहे. ५ नोव्हेंबरपासून उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथचे दर्शन होणार आहे. संपूर्ण हिवाळ्यात केदारनाथ येथेच विराजमान असतात. या वर्षी १६ लाख लोक केदारनाथ धाम दर्शनासाठी आले होते. गेल्‍या ६ महिन्यांत १ लाख तीर्थयात्री केदारनाथाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. चारधामपैकी यमुनोत्री धामचे दरवाजेदेखील आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आले. तर उत्तरकाशी येथील गंगोत्री धामचे दरवाजे काल दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास बंद झाले. मात्र बद्रीनाथचे दर्शन १७ नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या