केनियामध्ये पुरामुळे हाहाकार ७० बळी! १३ हजार घरांची पडझड

नैरोबी – केनियामध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून या पुरामध्ये आतापर्यंत ७० जणांचा बळी गेला आहे. पुरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुरामध्ये सुमारे १३,३०० घरांची पडझड झाली असून तेवढी कुटुंबे विस्थापित झाली आहेत. २२ रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तर २६ शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत.
केनिया सरकारचे प्रवक्ता इसाक मायगुवा म्वाऊरा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून पूरस्थितीची माहिती दिली आहे. पुरामध्ये बळी गेलेल्या नागरिकांचा अधिकृत आकडा आता ७० वर पोहोचला आहे, असे म्वाऊरा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी दक्षिण केनियामधील मकुएनी काऊंटीमध्ये प्रवासी वाहतूक करणारा एक ट्रक पाण्याच्या लोंढयाबरोबर वाहून गेला. या ट्रकमध्ये किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top