केरळचे राज्यपाल आरीफ खान रामलल्लासमोर नतमस्तक

लखनौ – केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी नुकतीच अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. केरळच्या राजभवनाने अधिकृत एक्स हँडलवर याची माहिती दिली आहे.

राजभवनाने राज्यपाल खान यांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राज्यपाल रामलल्लासमोर गुडघे टेकवून नतमस्तक होताना दिसत आहेत. त्यावेळी मंदिरात जय श्रीराम असा जयघोष ऐकू येत आहे.

राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल खान यांनी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी आपण याआधी जानेवारी महिन्यात दोन वेळा राम लल्लाचे दर्शन घेतले होते, असे खान यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top