केळशीत अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरी उपचार मिळणार

मडगाव

गोव्यातील केळशी गावात अंथरुणाला खिळलेलया रुग्णांच्या सेवेसाठी महिन्यातून एकदा डॉक्टरांची टीम त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सेवा देणार आहे. ही सेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे. बुधवारपासून केळशी पंचायतीकडून दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय तसेच सिप्ला कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला.

केळशी गावात सुमारे ४५ रुग्ण असे आहेत. त्यांना घरातून रुग्णालयात नेणे शक्य नाही, ते अशक्त आहेत, त्यांची देखभाल करणारे कुणीही नाहीत, अश्या रुग्णांना ही सेवा देण्यात येणार आहे. या रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले जाणार आहेत. पंचायतीचे स्वयंसेवकही या कामात मदत करणार आहेत, अशी माहिती सरपंच डिक्सन वाझ यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top