हैदराबाद
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते ७ डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या एरवल्ली येथील फार्महाऊसमध्ये पडले होते. यावेळी त्यांचे हिप बोन फॅक्चर झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर यशोदा रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आज ७ दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांना हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.