कॉंग्रेसचे ‘डोनेट फॉर न्याय’ अभियान पहिल्या दोन तासांत २ कोटी जमा

नवी दिल्ली- कॉंग्रेस पक्षाने ‘डोनेट फॉर देश’ या देणगी अभियानानंतर डोनेट फॉर न्याय हे दुसरे देणगी अभियान सुरु केले आहे राहुल गांधीच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’साठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत पहिल्या २ तासातच २ कोटी जमा झाले, अशी माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली.

काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी या अभियानां संदर्भातपक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजय माकन यांच्यासह काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश, खासदार इम्रान प्रतापगढी, प्रोफेशनल कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती उपस्थित होते.यावेळी अजय माकन यांनी सांगितले की,राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किमी प्रवास करणार आहे.

या पार्श्वभुमीवर १ पैसा प्रति किमी असे ६७ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे देता येईल,६७० रुपये देणाऱ्या देणगीदात्याना राहुल गांधीची स्वाक्षरी असलेले टी शर्ट देण्यात येईल. तर, ६७ हजार रुपये देणाऱ्या देणगीदात्याना एक किट मिळेल.त्यात बँड, टीशर्ट, भारत जोडो न्याय पात्रेचे स्टिकर आणि एक पिशवी मिळणार आहे.तसेच राहुल गांधींच्या स्वाक्षरीचे पत्र मिळणार आहे.तसेच सर्व देणगीदात्याना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्ग, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल,कोषाध्यक्ष अजय माकन यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.डोनेट फॉर देश अभियानाअंतर्गत आतापर्यंत १७ कोटी रुपये जमा झाले आहेत. लवकरच हा आकडा २० कोटीच्या पुढे जाईल,या अभियानात ८३ टक्के देणगी यूपीआयच्या माध्यमातून जमा झाले आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top