कोचिंग क्लास संघटना पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

ठाणे- पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी सध्या जोरात सुरू आहे. यासाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. घराघरात जाऊन पदवीधर मतदार शोधून त्यांची नोंदणी केली जात असताना आता कोचिंग क्लास संचालक संघटनेनेसुद्धा निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी काल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरी रंगायतन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ‘महाराष्ट्र सरकार खासगी क्लासमध्ये असलेल्या शिक्षकांकडे दुर्लक्ष करत आहे, संघटनेच्या पुढे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना उमेदवार उभा करणार आहे,’ असे राज्य सचिव ॲड. सचिन सरोदे म्हणाले.
‘कोचिंग क्लासच्या शिक्षकांकडे सरकार लक्ष देत नाही, पण खासगी कोचिंग क्लास सरकारच्या मते समांतर शिक्षण संस्था चालवत आहेत. सरकारच्या मते हे बेकायदेशीर आहे, या शाळा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना कोचिंग क्लासमध्ये शिकवण्यास सरकारी बंदी आहे. विध्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन, हे खासगी क्लास चालवतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी क्लासवाल्यांची दुकान बंद करणार असे म्हटले आहे, त्यामुळे या संघटनेला पदवीधर मतदारसंघात कितपत यश येईल, ते येणारा काळच सांगेल, असेही सरोदे यावेळी म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top