कोयना परिसरात भूकंप जीवितहानी नाही

पाटण – कोयना नगर परिसरामध्ये आज दुपारी ३.२६ वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंप झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोयना हे धरणक्षेत्र असल्याने या परिसरात वारंवार भूकंप होतात.