कोरोनाचे ७६१ रुग्ण१२ कोरोना बाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून आज दिवसभरात कोरोनाच्या ७६१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचा नवा व्हॅरिएन्ट असलेल्या जे एन -१ ची संख्या ६१९ झालेली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४३३४ आहे. आज ७६१ नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळ आणि कर्नाटक या दाक्षिणात्य राज्यांमध्ये आहे. केरळ मध्ये १२४९, कर्नाटकात १२४०, महाराष्ट्रात ९१४,तामिळनाडू १९० तर छत्तीसगड व आन्धर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२८ रुग्ण आहेत.
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या जे एन -१ चे ६१९ रुग्ण आहेत. यामध्ये कर्नाटकात सर्वाधिक १९९, तर केरळ मध्ये १४८ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ११० , गोव्यात ४७ तर गुजरातमध्ये ३६ रुग्ण आहेत . त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top