Home / News / कोरोनामुळे भारतात सरकारी आकड्यांपेक्षा ८ पट अधिक मृत्यू

कोरोनामुळे भारतात सरकारी आकड्यांपेक्षा ८ पट अधिक मृत्यू

सायन्स ॲडव्हान्स पब्लिकेशनचा अहवालनवी दिल्लीभारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ लाख ४८ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा आकडा केंद्र सरकारकडे आहे. मात्र,...

By: E-Paper Navakal

सायन्स ॲडव्हान्स पब्लिकेशनचा अहवाल
नवी दिल्ली
भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ लाख ४८ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा आकडा केंद्र सरकारकडे आहे. मात्र, आता सायन्स ॲडव्हान्स पब्लिकेशनच्या नव्या अहवालात केंद्र सरकारचे हे आकडे चुकीचे असल्याचे म्हटले असून २०२० मध्ये भारतात कोरोनामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा ८ पट अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
सायन्स ॲडव्हान्स पब्लिकेशनने हा अहवाल नुकताच प्रकाशित केला. या अहवालात कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतात १२ लाख लोकांनी आपला जीव गमावल्याचे स्पष्ट केले आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त दिसून आला. भारतात पुरुषांचे सरासरी आयुर्मान २.१ वर्षांनी घटले तर महिलांचे 3 वर्षांनी घटले. जगभरात पुरुषांचे जीवनमान महिलांच्या तुलनेत अधिक घसरले असल्याचे या अहवालात म्हटले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत ४.८१ लाख लोकांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात ही आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आणि संघटनेने दावा केला की, भारतात २०-६५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, जो संपूर्ण जगात सर्वाधिक होता. मात्र केंद्र सरकारने जागतिक आरोग्य संघटनेचा दावा फेटाळला होता.

Web Title:
संबंधित बातम्या
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.