कोरोनामुळे २४ तासांत देशभरात ६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली- भारतात एका दिवसात कोविड-१९ चे २९० नवीन रुग्ण आढळले असून २४ तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला.तसेच देशात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता २०५९ वर पोहोचली आहे,अशी माहिती काल रविवारी आरोग्य मंत्रालयाने दिली.

आरोग्य मंत्रालयाने काल सकाळी ८ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत सहा कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यात केरळमधील चार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.गेल्या वर्षी ५ डिसेंबरपर्यंत, कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती.३१ डिसेंबर २०२३ रोजी मात्र एकाच दिवसात ८४१ नवीन प्रकरणाची नोंद झाली होती.ही आकडेवारी मे २०२१ मध्ये नोंदविलेल्या सर्वोच्च प्रकरणाच्या ०.२ टक्के आहे.परंतु व्हायरसच्या नवीन उपप्रकार असलेल्या जे.एन.१ च्या प्रकरणामध्ये सध्या हिवाळ्याच्या हंगामामुळे वाढ होऊ लागली आहे.तरीही यातील घरीच उपचार घेत असलेले सुमारे ९२ टक्के रुग्ण असून ते बरे होत आहेत.तसेच जे.एन.१ च्या नवीन विषाणूमुळे नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत नाही. रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांची संख्या कमी आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top