कोरोना होऊन गेलेल्यांना हृदयविकाराचा धोका

  • केंद्रिय आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य
    नवी दिल्ली – ज्यांना कोरोना होऊन गेला त्यांनी किमान एकदोन वर्ष तरी अंग मेहनतीची कामे टाळावीत अन्यथा हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले.
    दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडवीय यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही आहे. या स्थितीत ज्यांना पूर्वी कोरोना होऊन गेला आहे त्यांना हृदयविकाराचा धोका आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसरच्या अभ्यासाचा हवाला देऊन आरोग्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले . ते पुढे म्हणाले सध्या हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूच्या घटना वाढलेल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या नवरात्रोत्सवात गरबा खेळताना काही तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व शारीरिक श्रमामुळे अधिक प्रमाणात होत असल्याचे आढळून आलेले आहे खास करून ज्यांना कोरोना होऊन गेला त्यांनी अंगमेहनतीची कामे शक्यतो टाळावीत आणि हृदयरोगापासून आपला बचाव करावा असा सल्लाही दिला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top