कोलकातामध्ये २४ डिसेंबरला १ लाख लोक गीता पठण करणार

कोलकाता

कोलकाता शहरात गंगाकिनारी येत्या २४ डिसेंबर रोजी तब्बल एक लाख लोक भगवत गीतेचे सामूहिक पठण करणार आहेत. या प्रसंगी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी काल सांगितले. या कार्यक्रमाला ‘एक लाख गीता पाठ’ असे नाव देण्यात आले असून तो कोलकाता शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या ब्रिगेड परेड मैदानात पार पडणार

याबाबत बोलताना मजुमदार म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अनेक धार्मिक संघटना एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमात कोणतेही राजकारण नसेल. त्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस आणि अन्य राज्यांतील अन्य मान्यवरांनाही देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाजपशी संबध नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top