Home / News / कोल्हापूरच्या अनेक भागात रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग

कोल्हापूरच्या अनेक भागात रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग

कोल्हापूर- शिरोळ आणि हातकणंगलेसह अनेक भागात सध्या रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग दिसत आहे. ज्वारी,गहू, हरभरा,मका,करडई आणि सूर्यफुल यासारख्या पिकांची मोठ्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कोल्हापूर- शिरोळ आणि हातकणंगलेसह अनेक भागात सध्या रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग दिसत आहे. ज्वारी,गहू, हरभरा,मका,करडई आणि सूर्यफुल यासारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या रब्बीच्या हंगामात गुंतला आहे.

काही शेतकरी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लहान ट्रॅक्टरने रब्बीची पेरणी करत आहेत.त्यामुळे शेतकर्‍यांची कामे सोपी आणि जलद होण्यास मदत मिळत आहे.पारंपरिक बैलजोड्या कमी होऊ लागल्याने शेतकरी आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळला आहे.रब्बी हंगामासाठी सुरू असलेली ही लगबग आणि उत्पादनाच्या नव्या पद्धतीमुळे या जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा आत्मविश्वास वाढला आहे.त्यामुळे यंदा रब्बीच्या पिकांचा उच्चांकी विक्रम होण्याची शक्यता शेतकरीवर्ग व्यक्त करत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या