खटाव तालुक्यात अवतरले गुलाबी पंखाचे परदेशी पाहुणे

कराड- सध्या गुलाबी थंडीच्या वातावरणात खटाव तालुक्यातील येरळवाडीत गुलाबी रंगाचे पंख असलेले सात परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत.येरळवाडी मध्यम प्रकल्पातील पाणथळ भागात गुलाबी फ्लेमिंगो पक्षांचे आगमन झाले आहे. या परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटक आनंदी दिसत आहेत.

येरळवाडी तलाव परिसरात रोहित आणि अग्निपंख नावाने ओळखले जाणारे सात फ्लेमिंगो आले आहेत. अग्निपंख फ्लेमिंगो सुमारे चार ते पाच फुट लांबीचे असतात.त्यांचे पाय आणि पंख गुलाबी रंगाचे असतात. ते हवेत झेपावतात,तेव्हा अग्निज्वाळा हवेत जात असल्याचा भास होतो.हे परदेशी पाहुणे पेरू,चिली,
मंगोलिया,बोलव्हिया तसेच भारतातील कच्छच्या रणात आढळतात.येरळवाडीत आलेल्या सात फ्लेमिंगोपैकी चार हे ग्रेटर आणि तीन जुवेनाईल पक्षी आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top