Home / News / खडकवासला धरणातून विसर्ग नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणातून विसर्ग नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खडकवासला धरण परिसरात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदी पात्रात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खडकवासला धरण परिसरात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदी पात्रात १२,९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहराला चार धरणातून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करणारी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे काठोकाठ भरली आहेत. सध्या चारही धरणांत २८.३४ टीएमसी म्हणजेच ९७.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. आज सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ४८ मिलीमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी २४ मिलीमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक तर पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. हे पाणी खडकवासला धरणात येते. त्यानंतर धरणातून ते मुठा नदीपात्रात सोडण्यात येते.

Web Title:
संबंधित बातम्या