खडसे यांच्यासह पत्नी-जावयाला नियमित अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई हायकोर्टाने खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना नियमित स्वरुपाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांनी २०१६ मध्ये त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे भोसरीतील एमआयडीसीत एक भूखंड खरेदी केला होता. हा भूखंड बाजारभावापेक्षा अगदी कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ११ आक्टोबर २०२३ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यात हायकोर्टाकडून २४ नोव्हेंबर २०२३ला खडसे यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता हायकोर्टाने अंतरिम जामिनाच्याच अटी-शर्तीवर त्यांना नियमीत जामीन मंजूर केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top